
जळगाव मिरर | १५ जून २०२४
जळगाव शहरात गेल्या दोन दिवसापासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यावर त्यासह शहरातील अनेक परिसरात मनपाने नालेसाफ सफाई न केल्याने ते पाणी आता नागरिकांच्या घरात येवू लागल्याची घटना दोन दिवसापासून घडू लागल्या आहे.
शहरातील प्रभाग क्र.१ मधील राधाकृष्ण नगर, नवीन कानळदा रोडवर पाणीच पाणी झाले आहे तर दत्तात्रय नगर परिसरात बनविण्यात आलेल्या रस्त्यावर देखील पाणी आल्याने नागरिकांना ये – जा करणे कठीण झाले आहे. तसेच राधाकृष्ण नगरला नवीन उड्डाणपुलाजळील परिसरातील काही घरामध्ये नाल्याचे पाणी घुसले आहे. परिसरातील नागरिक दीपक सखाराम सोनवणे यांनी हि माहिती दिली आहे.





















