जळगाव मीरर | १९ ऑक्टोबर २०२४
अनेक वर्षांपासून वैद्यकीय सेवा तसेच फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या डॉ संभाजीराजे आर. पाटील वर्षभरापासून राष्ट्रवादी काँग्रेस – अजितदादा गट यांच्या संपर्कात होते.सहा महिन्यापूर्वीच पक्ष प्रमुख श्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिलजी तटकरे साहेब व महिला अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केलेल्या डॉ संभाजीराजे यांनी हजारोच्या वर कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश तसेच जनाशीर्वाद यात्रेनिमित्ताने मतदार संघात घेतलेल्या ६५,००० वर नागरिकांच्या प्रत्येक्ष भेटी यामुळे मोठा प्रतिसाद डॉ.संभाजीराजे याना मिळताना दिसतोय,याचे फलित म्हणून एरंडोल पारोळा मतदारसंघ हा महायुती कडून अजितदादा गटाकडून डॉ संभाजीराजे ना अनुकूल असल्याचा पक्ष तसेच विविध सर्वे सांगत आहे.
नुकत्याच झालेल्या रुपालीताई चाकणकरांच्या पारोळा येथील महिला संवाद यात्रनिमित्ताने दिलेले भेटीत डॉ.संभाजीराजे पाटील यांच्या कार्याचा आढावा प्रत्यक्ष बघून त्याबाबतचा अहवाल देखील पक्षाकडे मांडण्यात आल्याचं माहिती मिळतेय.यासाठी डॉ संभाजीराजे यांना कालपक्षाकडून तातडीने मुंबई गाठण्याचे आदेश मिळाले आणि त्या अनुषंगाने जळगाव जिल्हा पदाधिकारी तसेच मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांसह डॉ संभाजीराजे मुंबईसाठी रवाना झाल्याचे सूत्रांकडून माहिती मिळतेय. यामुळे एरंडोल- पारोळा मतदारसंघात एक नवीन चेहऱ्याला संधी मिळणार ? विद्यमान आमदारांचे तिकीट कापणार? एरंडोल- पारोळा मतदारसंघासाठी महायुतीच्या जागेसाठी नेमकी कुणाची वर्णी लागणार ?अश्या चर्चेला उधाण आलाय.
“लवकरच एक चांगली बातमी देऊ,कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे संकेत दिले आहेत” एवढ्याच सूचक शब्दात डॉ संभाजीराजे पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधल्यावर मत व्यक्त केले आहे.