जळगाव मिरर | १४ डिसेंबर २०२३
यावल शहरातील एका शाळेच्या परिसरात एका १५ वर्षीय मुलीस तीन तरुणांनी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी तिघाविरोधात यावल पोलिसात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल शहरातील एका परिसरातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी शहरातील एका शाळेत शिक्षण घेत असून दि.१३ डिसेंबर रोजी अल्पवयीन मुलगी शाळेच्या गेटजवळ असतांना तीन तरुणांनी या ठिकाणी येत अल्पवयीन मुलीला त्यातील एक तरुणाने अल्पवयीन मुलीचा हात पकडून म्हणाला कि, माझ्याशी लव करायचे आहे कि नाही असे बोलून मुलीचा विनयभंग केला यावेळी मुलीचा भाऊ व त्याचा मित्र आला असता त्याला देखील या तिघांनी फायटरने मारहाण केल्याची घटना घडल्या नंतर अल्पवयीन मुलीसह तिच्या परिवाराने यावल पोलिसात धाव घेत तीन तरूणाविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. विनोदकुमार गोसावी करीत आहेत.