जळगाव मिरर / ५ मार्च २०२३ ।
देशभर ८ मार्च हा दिवस महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात येत असतो. यंदाच्या महिला दिनी जिल्ह्यातील महिलांना एक उत्तम पर्वणी ठरणार आहे. ज्या महिलांना शिक्षण घेवून आपल्या पायावर उभे राहायचे अशासाठी हि एक सुवर्णसंधीच आहे. शहरातील स्वप्न साकार महिला सक्षमीकरण केद्राच्यावतीने तरुणी, महिलांसाठी शैक्षणिक क्षेत्रातील डिप्लोमा इन अंगणवाडी सुपरवायझर आणि डिप्लोमा इन मॉन्टेसरी चाइल्ड एज्युकेशन हे दोन कोर्सचे उदघाटन ८ रोजी होत असल्याची माहिती स्वप्नसाकार फौऊडेशनच्या अध्यक्षा भारती काळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
स्वप्न साकार महिला सक्षमीकरण केंद्र येत्या ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन असल्याने. स्वप्न साकार महिला सक्षमीकरण केंद्राचे शुभारंभ करीत आहे, महिला सक्षमीकरणांमध्ये जळगाव जिल्ह्यात भर पडणार आहे. एकविसाव्या शतकात पदार्पण करुनही स्त्री सक्षमीकरणात आपण मागे आहोत. असे म्हणतात स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंब शिकते. आजही बरीच बंधने जुगारून प्रगतीच्या वाटेकडे वाटचालीसाठी खूप गतिरोधक स्त्री ला येत असतात. यासाठी स्री स्वावलंबी बनवून सक्षम बनणे खूप काळाची गरज झाली आहे. यासाठी स्वप्न साकार फाउंडेशन महिलांसाठी गेल्या सात वर्षापासून कार्यरत आहे. हॉस्पिटल क्षेत्रातील फोर्सेस देऊन हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून आजपर्यंत महिला सक्षमीकरणांमध्ये महिलांना रोजगार उपलब्ध करून देत आहे. यासाठी इन्स्टिट्यूट ला कौन्सिल ऑफ एज्युकेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कमी कालावधीमध्ये प्रशिक्षण देऊन मेडिकल क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून इन्स्टिट्यूट प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तसेच स्वप्न साकार फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांच्या विविध समस्यांसाठी स्री सक्षमीकरणांमध्ये इन्स्टिट्यूट विविध उपक्रम राबवत आहे. यशस्वी मार्गदर्शनासह स्वावलंबी जीवन जियांनी कसे जगावे यावर नेहमी हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या संचालिका भारती काळे मार्गदर्शन करीत असतात कमी कालावधीमध्ये प्रशिक्षण घेऊन महिला आपल्या जबाबदारीने कुटुंब व स्वतः सक्षम होऊन आपल्या जबाबदाऱ्या पार पाडू शकतात.
मेडिकल क्षेत्रातील टेक्निशियन व असिस्टंट कोर्सेस सोबत संस्था यावर्षी महिला दिनानिमित्त स्वप्न साकार महिला सक्षमीकरण केंद्र गोलाणी मार्कट दुसरा मजला ऑफिस नंबर एफ ७ येथे सुरू करीत आहे. त्यामध्ये डिप्लोमा इन अंगणवाडी सुपरवायझर आणि डिप्लोमा इन मॉन्टेसरी चाइल्ड एज्युकेशन अशा शैक्षणिक क्षेत्रातील दोन कोर्स महिलांसाठी घेऊन येत आहे. मेडिकल व शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्त्रियांसाठी प्रगतीची कवाडे नेहमीच उघडी असतात. कमी कालावधीमध्ये प्रशिक्षण घेऊन व प्रमाणपत्र प्राप्त करून महिला रोजगार उपलब्ध करू शकतात किंवा स्वतःच प्लेग्रुप अंगणवाडी उभारू शकतात. जळगाव जिल्ह्यासाठी हे सक्षमीकरण केंद्र काम करणार आहे बेसिक व कमी कालावधीमध्ये हे कोर्सेस महिलांना उपयुक्त असून स्त्रियांनी या संधीचा लाभ घ्यावा तसेच महिला दिन असल्याने विशेष सूट महिलांना देण्यात येणार आहे मेडिकल हॉस्पिटल क्षेत्रातील व शैक्षणिक क्षेत्रातील कोर्सेस साठी संस्थेला एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा भारती रवींद्र काळे यांनी केलेले आहे तरी आपण आपला जिल्हा विकसित करूया व महिलांना प्रगत करण्यासाठी त्यांच्या पंखात बळ देऊन सक्षम करून या उपक्रमामध्ये सहभागी होऊया.