जळगाव मिरर | ४ ऑगस्ट २०२३
राज्यातील अनेक तरूण शासकीय नोकरीत संधी मिळण्यासाठी मोठी कसरत करीत असतात. नुकतेच भारतीय टपाल विभागाने देशातील विविघ मंडळांमध्ये ग्रामीण डाक सेवकांच्या पदांसाठी बंपर भरती करण्यात येणार आहे. सर्व मंडळांमध्ये एकूण ३०,०४१ पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी दि. ३ ऑगस्टपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारा दि. २३ ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतो.
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, मिझोराम, आंध्रप्रदेश, हरियाणा, पंजाब, आसाम आदी राज्यांतील रिक्त पदांंवर भरती होणार आहे.
पदांची नावे
भरती अधिसूचनेनुसार
शाखा पोस्ट मास्तर
सहाय्यक शाखा पोस्ट मास्तर
डाक सेवक
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार किमान १० वी पास असणे आवश्यक आहे.
शालेय काळात गणित, इंग्रजीसह स्थानिक भाषांचा अभ्यास आवश्यक आहे.
संगणकाचे बेसिक ज्ञान असणे आवश्यक
सायकल चालवता येणे आवश्यक
अर्जासाठी किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ४० वर्षे आहे.
अनुसूचित जाती, जमाती (SC/ST) च्या उमेदवारांना कमाल वय ५ वर्षांची सूट मिळेल. आणि इतर मागास वर्गियांना ३ वर्षांची सूट मिळेल.
अशी आहे निवड प्रक्रिया
कोणतीही लेखी परीक्षा नाही.
१० तील गुणांच्या आधारे निवड
सादर अर्जांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार होणार.
उच्च शैक्षणिक पात्रता असणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे प्राधान्य नाही.
वेतन
शाखा पोस्ट मास्तर – १२,००० ते २९,३८० रुपये प्रति महिना
सहाय्यक शाखा पोस्ट मास्तर – १०,००० ते २४,४७० रुपये प्रति महिना