
जळगाव मिरर / २८ डिसेंबर २०२२
राज्याचे लक्ष लागून असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर सहजीवन व्याख्यानमाला बोलत आहे यावेळी त्यांनी राजकारण व महाराष्ट्र यावर मोठे भाष्य केले.
ते म्हणाले कि, ”तरुणांनो राजकारणात या. अनेक डाॅक्टर्स, नाटक – चित्रपटात आले आणि यशस्वी झाले. मुळ प्रश्न सोडायचे असेल तर राजकारणात यायलाच हवे. नुसते घरात बसून राहू नका. घरात बसून बोटे मोडणे महाराष्ट्राच्या हिताचे नाही. माझी विनंती आहे की, राजकारणात या. राजकारणात विविध अंग असतात. माझी इच्छा आहे की, तुम्ही राजकारणात यावे. कुणाची इच्छा असेल तर आपण जरुर मला येऊन भेटावे. मी तुमच्यासोबत काम करायला तयार आहे अशी खुली ऑफरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात दिली.
राज ठाकरे म्हणाले, क्रांतिकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी राजकारणात यायला हवे. या क्षेत्रात यायला कुठलीही बंधने नाहीत. वारसा- फिरसा लागतो ते साफ खोटे आहे. वारसा असलेले राजकारणी त्यांचे मुले – मुली राजकारणात आणू शकता पण लादू शकत नाही. राज ठाकरे म्हणाले, आपल्यात सुज्ञपणा नसेल तर सुशिक्षित असून काय फायदा. वीजेसह इतर गोष्टींचे दर जनता नाही तर राजकारणी ठरवत आहेत. शाळेचा अभ्यासक्रम सरकार, प्रशासन ठरवते. तुम्ही निमुटपणे सहन करता तुम्ही जाब विचारत नाही. या परिस्थितीत अनेक तरुण- तरुणी कंटाळतात व ते परदेशात जातात. तुमचे गप्प राहणे, तुमचा सहभाग राजकारणात नसणे यामुळे आजुबाजूचा परिसर, वातावरण बरबाद होत आहे. राज ठाकरे म्हणाले, राजकारण वाईट नाही. तुमच्या आयुष्याशी निगडीत, पिढ्यांच्या भविष्यांशी निगडीत राजकारण वाईट नाही. राजकारण चुकीच्या लोकांच्या हातात पडतेय. राजकारण नासवण्यात येत आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र युपी, बिहारसारखा जाती- पातीत बरबाद होत असेल तर कुठे महाराष्ट्राला नेत आहोत आपण याचा विचार करण्याची गरज आहे.





















