जळगाव मिरर / २८ एप्रिल २०२३ ।
गेल्या आठवड्यात हिंदू धर्मातील महत्वाचा सन असलेला अक्षय तृतीया येवून गेला त्यावेळी सोन्याच्या बाजारात अनेक चढउतार पाहायला मिळाली पण गेल्या दोन दिवसापासून सोन्यासह चांदीचे दर कमी झाले होते. पण आज पुन्हा सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे लग्नसराईचा उत्साह द्विगुणित होणार आहे.
लग्नाच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी सराफ बाजारात यजमानांची गर्दी दिसून येत आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,750 रुपये तर 24 कॅरेट साठी 60,820 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 762 रूपये आहे.
चेन्नई – 61,310 रुपये
दिल्ली – 60,970 रुपये
हैदराबाद – 60,820 रुपये
कोलकत्ता – 60,820 रुपये
लखनऊ – 60,970 रुपये
मुंबई – 60,820 रुपये
पुणे – 60,820 रुपये
नागपूर – 60,820 रुपये