
जळगाव मिरर | ३ जून २०२४
तमाशात काम करणाऱ्या कुटुंब काम संपल्यानंतर आपल्या मूळ गावी जाण्यासाठी निघाले. यावेळी अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. ही घटना दि. ३१ मे रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जालना जिल्ह्यातील एका तालुक्यातील महिला तीच्या मुलीसोबत जळगाव जिल्ह्यातील एका तमाशामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून काम करीत होत्या. तमाशाचे काम संपल्यामुळे दि. ३० मे रोजी ते महिन्याच्या पगाराचा व्यवहार झाल्यानंतर महिला १६ वर्षीय मुलीला घेवून गावाकडे निघाली. दरम्यान, महिला तिच्यासोबत असलेल्या महिलेला तु पुढे चाल असे असे म्हणत निघाल्यानंतर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. दरम्यान, शोध घेवून देखील ती मुलगी मिळून येत नसल्याने महिलेने तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर हे करीत आहे.





















