
जळगाव मिरर | १६ जून २०२४
तालुक्यातील देव्हारी येथील अलोक रवींद्र लुले (वय-१८, रा. देव्हारी, ता. जळगाव) या तरूणाने आपल्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना दि. १४ जून रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उघडीकस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील देव्हारी येथे रवींद्र घुले यांचे शेत असून शुक्रवारी दिनांक १४ जून रोजी सकाळी त्यांचा मुलगा अलोक हा शेतात गेला होता. सकाळी त्याने नांगरटी केली, त्यानंतर घरी आला. घरी आंघोळ केल्यानंतर आलोक हा पुन्हा शेतात गेला. त्यानंतर त्याने तेथेच एका झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. शेजारील शेतातील मंडळींना अलोक हा गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसला. त्यांनी घटनेची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली. यावेळी नातेवाईकांनी घटनास्थळी येवून एकच आक्रोश केला होता.





















