
जळगाव मिरर | १७ एप्रिल २०२५
राज्यातील कॉंग्रेस व भाजपच्या नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून आता भाजपच्या आमदारांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांना थेट आव्हान दिले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्या XX मध्ये हिंमत असेल तर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मु्ख्यालयाचे कुलूप तोडून दाखवावे, असे आव्हान भाजप आमदार संदीप जोशी यांनी दिले आहे. त्यांच्या या आव्हानामुळे आगामी काळात भाजप व कांग्रेसमधील वाक्युद्ध अधिकच गहिरे होण्याची शक्यता आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतीच नागपूर हिंसाचार व औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून भाजपवर निशाणा साधला होता. नागपूरच्या दंगलीनंतर हिंसाचाराची आग आपल्या घरापर्यंत पोहोचेल, याची भीती वाटल्यामुळे भाजपने औरंगजेबाच्या कबरीवरून माघार घेतली, असे ते म्हणाले होते. यासंबंधी त्यांनी संघ मुख्यालयाचेही नाव घेतले होते. या पार्श्वभूमीवर संदीप जोशी यांनी उपरोक्त आव्हान दिले आहे.
संदीप जोशी म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाच्या कुलुपाला हात लावण्याची हिंमत कुणाच्याह XX मध्ये नाही. हर्षवर्धन सपकाळ यांच्या XX मध्ये दम असेल, तर त्यांनी इकडे येऊन संघ मुख्यालयाच्या कुलुपाला हात लावून दाखवावा. मग ते आहेत आणि आम्ही आहोत. त्यांना असल्या वल्गना करायच्या होत्या, तर त्यांनी त्या अगोदर करायला पाहिजे होत्या. नागपूरची दंगल ही केवळ 4 तासांत आटोक्यात आली. ही दंगल कुणी व का घडली हे सर्वश्रूत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी चिथावणीखोर विधाने करण्यापेक्षा खरी सद्भवना दाखवावी.
भाजप किंवा संघाने औरंगजेबाच्या कबरीवरून माघार घेतली नाही. मराठ्यांनी आपल्या पराक्रमाने औरंगजेब व अफजलखानाला महाराष्ट्राच्या मातीत गाडले आहे. त्यामुळे हे सर्व विषय संपलेले आहेत अशी संघाची भूमिका आहे. परिणामी या मुद्याला फार उचलण्याची गरज नाही. हर्षवर्धन सपकाळ यांचे विधान हास्यास्पद व प्रक्षोभक आहे. त्यांना माहिती होते की, मुस्लिम बांधव संघ कार्यालयावर हल्ला करण्यास जाणार होते. संघ कार्यालयाचे कुलूप तोडणार होते. त्यांनी ही माहिती गुप्तहेर यंत्रणांना का दिली नाही? असा सवालही त्यांनी यासंबंधी उपस्थित केला.





















