
कोल्हापूर : वृत्तसंस्था
राज्यसभा निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेने त्यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. पण ऐनवेळी तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंचा फोन उचलला नाही. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य या संघटनेच्या स्थापनेची घोषणा केली होती. ९ ऑगस्ट म्हणजेच ऑगस्ट क्रांतीदिनी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार असून तुळजापूर येथील तुळजा भवानी मंदीर येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या स्वराज्य या नव्या संघटनेचा अधिकृत कार्यक्रमाची घोषणा त्यांनी केली आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी ट्वीट करत दिली आहे.
दरम्यान, राज्यसभा निवडणुका पार पडण्याच्या काही दिवस आधी संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य या संघटनेच्या स्थापनेची घोषणा केली होती. राज्यसभा निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेने त्यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. पण ऐनवेळी तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंचा फोन उचलला नाही असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर शिवसेनेच्या संजय पवार यांना राज्यसभेच्या निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला होता.
'#स्वराज्य'चा पहिला अधिकृत कार्यक्रम महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीच्या आशीर्वादाने…
क्रांतीदिनी होणार महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरूवात…
भेटूया ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता
तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर येथे… pic.twitter.com/IY1jWVSPU2— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 8, 2022
राज्यसभेच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या संभाजीराजेंनी स्वराज्य नावाच्या संघटनेची घोषणा केली होती. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या विचारांच्या मावळ्यांना एकत्रित करण्यासाठी ही संघटना काम करेल असं त्यांनी यावेळी सांगितलं होतं. त्यानंतर आता ऑगस्ट क्रांतीदिनाच्या निमित्ताने या संघटनेचा पहिला अधिकृत कार्यक्रम होणार आहे.




















