• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

मद्यप्रेमींच्या खिशाला बसणार मोठी झळ : सरकारने घेतला महत्वाचा निर्णय !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 10, 2025
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मद्यप्रेमींच्या खिशाला बसणार मोठी झळ : सरकारने घेतला महत्वाचा निर्णय !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० जून २०२५

राज्यातील महायुती सरकार गेल्या काही महिन्यापासून अनेक महत्वाचे निर्णय घेत असतांना आता गेल्या काही दिवसांपूर्वी देशात बिअरचे दर कमी होतील अशा बातम्यांमुळे मद्यप्रेमींना आनंद झाला होता. मात्र, आता राज्य सरकारने उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून दारूविक्रीवरील कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मद्यप्रेमींच्या खिशाला मोठी झळ बसणार असून, त्यांचं “सेलिब्रेशन”ही महागणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत IMFL (भारतीय बनावटीचे विदेशी मद्य) विक्रीवर कर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. या शुल्कवाढीमुळे राज्याच्या तिजोरीत 14000 कोटी रुपयांचा महसूल वाढणार आहे.

मद्यपींना आता एका क्वार्टरसाठी (180 मिली) 80 ते 360 रुपये मोजावे लागतील. यामध्ये, देशी दारू 180 मिलीसाठी 80 रुपये असेल, तर विदेशी प्रीमियम ब्रँड 180 मिलीसाठी 360 रुपये मोजावे लागतील.

राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर (IMFL) दीड टक्क्याने वाढ करण्यात आली असून, विदेशी मद्यावरही हा कर वाढवण्यात आल्याने आता मद्यप्रेमींसाठी हा निर्णय आर्थिकदृष्ट्या अडचणीचा ठरणार आहे.

देशी मद्य- 80 रुपये (180 मिली) महाराष्ट्र मेड लिकर – 148 रुपये (180 मिली) भारतीय बनावटीचे विदेशी मद्य – 205 रुपये (180 मिली) विदेशी मद्याचे प्रमीयम ब्रॅण्ड- 360 रुपये (180 मिली)

दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या उपायांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या विभागाचा महसूल वाढविण्याच्या दृष्टीने सचिवस्तरीय अभ्यासगट स्थापन करण्यात आला होता. या गटाने मद्यनिर्मिती धोरण, अनुज्ञप्ती, उत्पादन शुल्क तसेच कर संकलन वाढीसाठी इतर राज्यातील राबविण्यात येत असलेल्या चांगल्या पध्दतींचा, धोरणात्मक बाबींचा अभ्यास करुन शासनास शिफारशी व अहवाल सादर केला. त्या अनुषंगाने उत्पादन शुल्क विभागाच्या सुधारित आकृतीबंधास तसेच विभागाचे एकात्मिक नियंत्रण कक्ष उभारण्यास मान्यता देण्यात आली.

या कक्षाच्या माध्यमातून एआय प्रणालीद्वारे राज्यातील आसवन्या, मद्य निर्माणी, घाऊक विक्रेते आदींचे नियंत्रण करण्यात येणार आहे. विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार मुंबई शहर व उपनगरात एक नवीन विभागीय कार्यालय व मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर व अहिल्यानगर या सहा जिल्ह्यांकरिता प्रत्येकी एक वाढीव अधीक्षक कार्यालय नव्याने सुरू करण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बळकटीकरणासाठी 744 नवीन पदे व पर्यवेक्षीय स्वरूपाची 479 पदे अशा 1 हजार 223 पदांच्या सुधारित आकृतीबंध मान्यता देण्यात आली. विभागासाठी या विविध उपाययोजना राबवल्यानंतर मद्यावरील उत्पादन शुल्क व विक्री कराच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे 14 हजार कोटींची महसूल वाढ अपेक्षित आहे.

Related Posts

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !
राज्य

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन
जळगाव ग्रामीण

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026
शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी
राज्य

शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी

June 10, 2026
फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय
राज्य

फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय

June 9, 2026
केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !
जळगाव

केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !

June 9, 2026
आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !
जळगाव

आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !

June 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

June 17, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026
भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group