जळगाव मिरर | २८ जानेवारी २०२४
जळगाव शहरातील मारुतीपेठमधील अलंकार ज्वेलर्स आणि त्याच्याच बाजूला असलेले नूर पॉलिश सेंटर नावाच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील ड्रॉवरमधून 14 लाख 59 हजार रुपये किंमतीचे 251 ग्रॅम सोन्याचे मटेरीयल लांबवले. दि. २६ जानेवारी रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील राम पेठ परिसरातील सचिन प्रकाश सोनार (वय ३८) हे कुटुंबासह वास्तव्यास असून त्यांचे मारुतीपेठ येथे अलंकार नावाचे दागिने बनवण्याचे दुकान आहे. त्याच्या बाजूला नूर पॉलिश सेंटर नावाचे देखील पॉलिश मारण्याचे दुकान आहे. शुक्रवार, 26 जानेवारी रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन्ही दुकान फोडून दोन्ही दुकानातून एकूण 14 लाख 59 हजार रुपये किंमतीचे 251 ग्रॅम सोन्याचे मटेरीयल लांबवण्यात आले. हा प्रकार पहाटे चार वाजेच्या सुमारास उघडकीला आला. दरम्यान, सचिन सोनार यांनी शनिपेठ पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहे.