जळगाव मिरर | १० डिसेंबर २०२३
राज्यातील मराठा समाजाला आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली असून जरांगे पाटलांच्या सभांचा धडाका सध्या राज्यभर सुरू असून ते या सभांमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच छगन भुजबळांवर टीका करताना दिसत आहेत. वारंवार फडणवीसांवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांना भाजप आमदार नितेश राणे यांनी निशाणा साधत फडणवीसांवरील टीका खपवून घेतली जाणार नसल्याचे म्हणले आहे.
“मनोज जरांगे पाटलांना पहिल्याच दिवशी स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका कराल तर आम्ही कधी सहन करणार नाही. फडणवीसांवर टीका कराल तर आम्हालाही तुमच्या डोक्यात विष कोण टाकत आहे? तुमची भाषण कोण लिहून देत आहे? तुमच्या तोंडी मुस्लिम आरक्षणाची भाषा कोण करायला लावतय याची पुराव्यासकट यादी काढावी लागेल…” असे नितेश राणे म्हणालेत.