जळगाव मिरर / २२ एप्रिल २०२३ ।
राज्यातील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकतेच एका मुलाखतीत म्हणाले होते कि मी आता देखील मुख्यमंत्री होवू शकतो अशी टिप्पणी केली असता आता त्यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टोला लगावला आहे. ते अहमदनगर येथे शुक्रवारी २१ रात्री कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलत होते.
‘मी आजही मुख्यमंत्रिपदाचा दावा करू शकतो’ असे स्पष्टपणे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रथमच आपली महत्त्वकांक्षा जाहीरपणे व्यक्त केली आहे. मात्र, 2024मध्ये भाजप व शिवसेना युतीचाच मुख्यमंत्री होईल. अजित पवार यांनी स्वप्न पाहू नये, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.
यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे वक्तव्य केले याकडे लक्ष वेधले असता बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री होणे कोणाला आवडत नाही? परंतु संख्याबळाचा महत्त्वाचा मुद्दा असतो. तरीही अजित पवार यांना शुभेच्छा. परंतु 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेना युतीचे 200 हून अधिक जागा निवडून येतील. त्यामुळे उगीच कुणीही स्वप्न बघणे चुकीचे आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू आहे. त्यावरही चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अजित पवार यांच्याबाबत काही वावड्या उठत आहेत. त्याला अर्थ नाही. आजपर्यंत तरी असा कुठलाही प्रस्ताव भाजपकडे नाही. मागच्या तीन महिन्यांत राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार मला भेटलेले नाहीत. महाविकास आघाडीचे नेते अजित पवार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. अजित पवार यांनी भाजपशी संपर्क केलेला नाही.