जळगाव मिरर / १५ मार्च २०२३ ।
गेल्या काही दिवसापासून सोने व चांदीचे भाव स्थिर होते मात्र आता पुन्हा एकदा ग्राहकांना मोठा फटका बसणार असल्याची बातमी समोर आली आहे. देशात सोन्या आणि चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरणीचे सत्र सुरू होते, मात्र आज म्हणजेच 15 मार्च 2023 ला सोने – चांदीची झळाळी पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांची सुवर्ण संधी हुकली आहे.
म्हणजे पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या किमती वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत आज जर तुम्हाला सोने-चांदी खरेदी करायची असेल तर आधी त्याचे सुधारित दर जाणून घ्या कारण आज तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त खर्च करावा लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आजही 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या दरात (आज सोन्याचा भाव) 730 रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमतीत 3,300 रुपयांची उसळी झाली आहे.
22 कॅरेट किंमत
22 कॅरेट सोने 1 ग्रॅम – 5,408 रुपये
22 कॅरेट सोने 8 ग्रॅम – 43,264 रुपये
22 कॅरेट सोने 10 ग्रॅम – 54,080 रुपये
25 कॅरेटचा दर
24 कॅरेट शुद्ध सोने 1 ग्रॅम – 5,678 रुपये
24 कॅरेट शुद्ध सोने 8 ग्रॅम – 45,424 रुपये
24 कॅरेट शुद्ध सोने 10 ग्रॅम – 56,780 रुपये
चांदीचे दर
तर चांदीच्या दरात कालच्या तुलनेत त्यात प्रतिकिलो 3,300 रुपयांनी वाढ झाली आहे. अशा स्थितीत त्याचा बाजारभाव आज काहीसा असा असेल. यामध्ये 1 ग्रॅम चांदीचा भाव 72 रुपये आहे. तर आज 1 किलो चांदीची किंमत 72,000 रुपये आहे.