अमळनेर : विक्की उत्तम जाधव
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रतिमा पुजन परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब योगेश रघुनाथ महाजन सर यांचे हस्ते करण्यात आले तर ध्वजारोहन श्री.छोटुलाल एम.शिंदे सेवा निवृत्त जीआरपीएफ (पोलिस अधिकारी) रा.अमळनेर यांचे हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला जगदीश हिंमत महाजन, गणेश महाजन, राकेश चोरडिया, मुकेश चोरडिया, किशोर मडकु पाटील,सौ.वनिता पाटील व पालक उपस्थित होते.शाळेतील विशेष विद्यार्थी समवेत विशेष शिक्षक यांनी ध्वजगीत सादर केले व देशभक्तीपर गीत गायन (आओ बच्चो तुम्हे दिखाए,) नृत्य कला (शिवनेरी वर शिवबा जन्मला, हर हर शंभु,सुनो गौर से दुनिया वालो,नन्हा मुन्ना राही हूं), कवायत सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.तसेच जिल्हा स्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धां मध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विशेष विद्यार्थी यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थी यांना खाऊ वाटप करण्यात आला.या कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.