जळगाव मिरर | २१ जानेवारी २०२४
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक होत असतांना दिसत आहे नुकतेच शनिवारी अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे मनोज जरांगे निघाले असून दिवसभराचा प्रवास करून जरांगे यांनी मातोरी गावात मुक्काम केला. त्यानंतर जरांगे यांच्या पायी दिंडीचा आजचा दुसरा दिवस आहे. विशेष म्हणजे जरांगे यांच्यासोबत बच्चू कडू देखील या पायी दिंडीत सहभागी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आज निघणाऱ्या पायी दिंडीपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. 26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा, मुंबईत येऊ नका असे म्हणत दादागिरीची भाषा करू नयेत. त्यांना मराठ्यांची ताकद पहायची असेल, असे म्हणत जरांगे यांनी आज पुन्हा सरकारवर हल्लाबोल केला आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, संविधान हातात घेऊ नयेत, यावर तोडगा कसा काढता येईल पहावे, सत्ता येत असते जात असते. मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होणार आहे. आम्ही आमच्या मागणीवक्र ठाम आहे. आमच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यांना मराठ्यांची ताकद पहायची असेल. मराठा समाजाचा हा शेवटचा लढा आहेत. दोन दिवस वाट पाहणार अन्यथा त्यांनी आमच्या गावात येऊ नयेत. मुंबईला येऊ नका असे कसे म्हणतात, दादागिरीची भाषा करू नयेत. 26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा.