• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

अखेर मनसेने उचलले कठोर पाऊल : राज्य सरचिटणीससह चौघांनी केली हकालपट्टी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 25, 2025
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
अखेर मनसेने उचलले कठोर पाऊल : राज्य सरचिटणीससह चौघांनी केली हकालपट्टी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५  ऑगस्ट २०२५

राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने आपले राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर यांच्यासह अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे आणि सुबोध जाधव यांना पक्षातून बडतर्फ केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून खेडेकर यांच्या भारतीय जनता पक्ष (भाजप) किंवा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर मनसेने कठोर पाऊल उचलत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. या निर्णयामुळे कोकणातील मनसेच्या संघटनात्मक रचनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

वैभव खेडेकर हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जवळचे सहकारी आणि कोकणातील प्रमुख नेते मानले जातात. 2006 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केली, तेव्हापासून खेडेकर त्यांच्यासोबत होते. कोकणात, विशेषत: दापोली आणि खेड परिसरात, मनसेच्या संघटनात्मक उभारणीत खेडेकर यांचा मोठा वाटा आहे. खेडेकर यांनी 2014 मध्ये दापोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तरीही, त्यांनी खेड नगरपरिषद निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि स्वत: खेडचे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांच्या आक्रमक नेतृत्वशैलीमुळे आणि तरुणांमधील लोकप्रियतेमुळे खेड आणि दापोली परिसरात त्यांचा मजबूत जनसंपर्क आहे.

गेल्या काही महिन्यांपासून वैभव खेडेकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता. दापोलीत नुकत्याच झालेल्या महायुतीच्या एका कार्यक्रमात खेडेकर व्यासपीठावर उपस्थित होते, जिथे महायुतीच्या नेत्यांनी त्यांना भाजपमध्ये सामील होण्याची जाहीर ऑफर दिली होती. खेडेकर यांनी या वृत्तांचा इन्कार केला असला, तरी त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित असल्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर मनसेने खेडेकर यांच्यासह इतर तीन नेत्यांना पक्षातून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला.

मनसेने वैभव खेडेकर, अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे आणि सुबोध जाधव यांना पक्षातून बडतर्फ करताना पत्राद्वारे स्पष्ट केले आहे की, त्यांनी पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन केले तसेच पक्षविरोधी कारवाया केल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाने या नेत्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता थेट हकालपट्टी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Related Posts

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी
जळगाव

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी

July 30, 2026
प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !
जळगाव

आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !

July 26, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

August 28, 2026
रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

August 28, 2026
रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

August 28, 2026
जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

August 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group