जळगाव मिरर / ६ एप्रिल २०२३
शहरातील ६२ वर्षीय सेवानिवृत्त महिलेला अनोळखी भामट्याने लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महिलेने थेट जिल्हापेठ पोलिसात बुधवारी दुपारी चार वाजता अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील वानखेडे हाऊसिंग सोसायटीतील रहिवासी असलेल्या सुनंदा बाबूराव तायडे ( वय ६२) या सेवानिवृत्त असून २२ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अनोळखी नंबरवरून फोन आल्याने भामट्याने नेट बँकींगद्वारे पैसे पाठवायचे असल्याचे सांगून वयोवृध्द महिला आणि तिचा मुलगा विजय बाबुराव तायडे यांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे वर्ग करून एक लाख 90 हजारांची ऑनलाईन फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने मुलासह जिल्हापेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक शांताराम देशमुख करीत आहे.
