
जळगाव मिरर | ३० डिसेंबर २०२४
अज्ञान,अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी ” असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. “देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका.” अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली असे प्रतिपादन महाराष्ट्र परिट धोबी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संतोष वाघ यांनी केले आहे
कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर येथील ग्रामपंचायत व महाराष्ट्र परिट धोबी महासंघाच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच मनिषा माळी, उपसरपंच शरद वाबळे,कामगार तलाठी गोविंद खैरनार ,कोपरगाव तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष इंद्रभान ढोमसे,गौतम बॅंकेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र ढोमसे,पांडुरंग वाबळे सदस्य विजय कदम, परसराम वाबळे, सचिन वर्पे, सदस्य गणेश वाबळे, लक्षण शिंदे,सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल वाबळे आंबा सुर्यवंशी, नारायण वाबळे, नामदेव वर्प ,मनोज चव्हाण, श्रीपाद दळवी,अशोक दळवी, संगित पवार, ग्रामविकास अधिकारी महेश काळे , पत्रकार सिद्धार्थ मेहेरखांब यावेळी उपस्थित होते
यावेळी बोलताना राजेंद्र ढोमसे म्हणाले रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. , एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.दि. १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला.समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, देव दगडात नसून तो माणसांत आहे यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता