
जळगाव मिरर | १३ जानेवारी २०२५
राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच देशमुख यांच्या खुनाबाबत अनेक ठिकाणी मोर्चा निघाले असून आता या प्रकरणात आणखी एक अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे. वाल्मीक कराड यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी. माझ्या भावाना न्याय द्या म्हणत धनंजय देशमुख यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनाला सुरूवात केली आहे. यावेळी गावकऱ्यांनीही पाण्याच्या टाकीला घेराव घातला आहे. मस्साजोग ग्रामस्थांचा पाण्याच्या टाकीखाली ठिय्या मारला आहे. दरम्यान पोलिसही पाण्याच्या टाकीवर पोहोचण्याचे प्रयत्न सुरू केला आहे. तर दुसऱ्या पाण्याच्या टाकीवर चढून ग्रामस्थांनीही आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनादरम्यान धनंजय देशमुख यांची प्रकृती खालावल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे.
आरोपींवर जोपर्यंत कडक कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन करणार आहे. टॉवरवर चढून आंदोलन करणार असल्याचे देशमुख यांनी प्रशासनाला सांगितले होते. मात्र आज आक्रमक होत धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून जीवन संपवण्याचा इशारा दिला. त्यामुळे पोलिस प्रशासनामध्ये खळबळ उडाली. पोलिसांनीही पाण्याच्या टाकीवर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस पाण्याच्या टाकीवर आले तर आम्ही टाकीवरून खाली उड्या मारू असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.
याची दखल बीडच्या पोलिस अधीक्षकांनीही घेतली आहे. दरम्यान सीआयडीची टीम देशमुख कुटुंबियांची भेट घेणार असून, त्यांच्याशी चर्चा करणार आहे. गावकऱ्यांनीही संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना तात्काळ शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. या ठिकाणचा पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हे आंदोलन स्थळी पोहोचलेले आहेत. त्याच बरोबर जिल्हाधिकारीही मस्साजोग येथील आंदोलन स्थळी पोहोचले आहेत. प्रशासनाकडून धनंजय देशमुख यांना टाकीवरून खाली उतरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके या धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधण्यासाठी स्वतः धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधण्यासाठी शेजारच्या पाण्याच्या टाकीवर जाण्याचा प्रयत्न करीत आहेत.