जळगाव मिरर । २० ऑगस्ट २०२३
देशभरातील अनेक तरुण शिक्षण घेऊन देखील बेरोजगार आहेत. यासाठी सरकार नेहमीच शासकीय भरती आणून सेवेत दाखल करीत असते. जे तरुण केवळ १० वी पास आहेत. त्यांच्यासाठी हि उत्तम संधी असू शकते. अंदमान आणि निकोबारमधील भारतीय नौदल हेड क्वार्टरचे कमांड अंतर्गत ट्रेड्समन मेट पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. तर या भरती अंतर्गत एकूण ३६२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – ट्रेड्समन मेट.
एकूण रिक्त पदे – ३६२
शैक्षणिक पात्रता – १० वी पास किंवा संबंधित ट्रेडमध्ये ITI.
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – १८ ते २५ वर्षे.
ओबीसी – ३ वर्षांची सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.
अर्ज फी – कोणतीही फी नाही.
नोकरी ठिकाण – अंदमान आणि निकोबार/ संपूर्ण भारत.
महत्वाच्या तारखा –
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २६ ऑगस्ट २०२३
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ सप्टेंबर २०२३
अधिकृत बेवसाईट – https://www.andaman.gov.in/
भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1UZdnAY9xNr1wP0gPh2I3PXLZUqD4xQaD/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.