जळगाव मिरर | १७ नोव्हेंबर २०२३
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख यांच्या स्मृती दिनानिमित्त शिवसेना जळगाव महानगर तर्फे अभिवादन करण्यात आले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना जळगाव महानगरतर्फे शिवसेना जिल्हा कार्यालयाजवळ त्यांच्या प्रतिमेला माल्यारपण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे माजी महापौर जयश्री महाजन महानगर प्रमुख शरद तायडे अल्पसंख्यांक आघाडी महानगर प्रमुख जाकिर पठाण युवासेना जिल्हाप्रमुख पियूष गांधी उप महानगर प्रमुख प्रशांत सुरलकर फरीद खान युवासेना महानगर समन्वयक महेश ठाकूर महानगर प्रमुख यश सपकाळे निलेश जोशी जय मेहता गिरीश कोल्हे गजू कोळी पंकज जोशी अमोल मोठे विशाल वाणी विभाग प्रमुख विजय बांदल संजय सांगळे यश उपाध्ये आण्णा भोईटे मधुकर साबळे किरण ठाकूर मयूर गायकवाड बिरजू शिरसाठ कुंदन पाटील राकेश माळी निखिल सोनवणे पप्पू तायडे शरद पाटील जय वाणी पिंटू कोळी फिरोज शेख आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते