जळगाव मिरर / २ मे २०२३ ।
सध्याच्या राज्याच्या राजकीय वर्तुळात अजित पवार केंद्रस्थानी आहेत. अजित पवार भाजपसोबत जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे अजित पवार यांची प्रत्येक कृती अन् त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया उमटत असतात. काल अजित पवार यांना वज्रमूठ सभेत केलेल्या भाषणावरही प्रतिक्रिया उमटत आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी अजित पवार सोबत येणार असल्याचा दावा केला आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची नाराजी अन् युतीशी संभाव्य हात मिळवणी, यावर मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होतेय.अजित पवार युतीत सामील होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार युतीसोबत येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. गुलाबराव पाटील यांनी एक मोठा राजकीय गौप्यस्फोट केलाय. काही दिवसानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आमच्याकडे येत आहेत. अजितदादा आमच्याकडे आल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी किती बैठका झाल्या, हे सांगू असं गुलाबराव पाटील म्हणालेत.