जळगाव मिरर | ३ जानेवारी २०२४
जळगाव जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात गेल्या काही वर्षापासून अल्पवयीन मुलीसह तरुणीवर विनयभंग व अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतांना नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पाचोरा शहरात एका २३ वर्षीय तरुणीवर विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील एका परिसरात २३ वर्षीय तरुणी धुनी भांडी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत असते. दि.२२ एप्रिल रोजी तरुणी कामाला जात असतांना याच परिसरातील एक संशयित आरोपी तरुण या तरुणीचा पाठलाग करून तिला म्हणाला कि, तु जर माझ्या सोबत लग्न नाही केले तर तुला चाकू खोचून मारून टाकेल अशी धमकी देखील दिली तर त्यानंतर दि.३१ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास हा तरुण पुन्हा तरुणी कामावरून घरी जात असतांना तरुण या ठिकाणी दुचाकीवर आला असता तरुणीचा हात पकडून तु मला आवडतेस, तु माझ्या सोबत लग्न कर, असे सांगून फिर्यादीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तर फिर्यादीने लग्नास नकार दिल्यानंतर तरुणीने तरुणीला लाथ मारीत दगड मारून डोक्याला दुखापत झाली आहे. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, पाचोरा पोलिसात संशयित आरोपी तरूणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक.विजया वसावे हे करीत आहेत.