
जळगाव मिरर | १७ फेब्रुवारी २०२४
कोल्हापूरमध्ये शिंदे गटाचे दोन दिवसीय महाअधिवेशन पार पडत आहे. यामध्ये शिवसेनेचे वरिष्ठ नेते, शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना श्रीकांत शिंदे यांच्याही डोळ्यात पाणी आले. आनंद दिघेसाहेब गेल्यानंतर एकनाथ शिंदेसाहेब शिवसैनिकांचा आधार बनले. शिंदे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला आपले कुटुंब मानले. काहीही झाल्यावर सर्वप्रथम पोहचणारे शिवसैनिक म्हणजे शिंदे साहेब… मी त्यांनी कायम शिवसैनिकांमध्ये पाहिलंय, असं म्हणताना श्रीकांत शिंदेंच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.
बाप हा हळवा असतो मग तो बाप थेट राज्याचा मुख्यमंत्री का असेना.. ! कारण लेकाचे भाषण ऐकताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अश्रू अनावर झाले. कोल्हापूरमध्ये शुक्रवारी शिंदे गटाचे महाअधिवेशन पार पडले. यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी दमदार भाषण केले. यावेळी त्यांचे भाषण ऐकून मुख्यमंत्री भावुक झाले. त्यांनी स्वतः पोस्ट लिहून मला आणि श्रीकांतला अश्रू अनावर झाल्याचे म्हंटले आहे. तसेच श्रीकांतचं भाषण ऐकताना सगळा प्रवास झरकन डोळ्यासमोरून निघून गेला, असे भावनिक ट्विट त्यांनी केले आहे.
एकनाथ शिंदे यांचे ट्विट काय?
”शिवसेना हेच माझं सर्वस्व होतं, शिवसैनिक हेच माझं कुटूंब होतं. आयुष्यभर मी त्यांच्यासाठी काम केलं पुढे काय होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती नेहमी पुढचा विचार करणाऱ्या माझ्या मनाने मागे वळून कधी पाहिले नव्हते. पण आज श्रीकांतच्या मुखातून निघालेल्या शब्दांमधून मला माझा काल दिसला”. असे पहिले ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले.
तर सगळा प्रवास झरकन डोळ्यासमोरून निघून गेला. त्यांचे भाषण जसे संपले तसे आम्ही दोघेही मनातून मोकळे झालो. नकळत त्याच्याही आणि माझ्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले. आमच्यासह आमचे शिवसेना हे कुटूंबही पुरते हेलावून गेले. यावेळी माझ्या प्रत्येक सुखदुःखात सोबत असलेले माझे कुटूंबीय माझे…असे दुसरे भावनिक ट्विट शिंदेंनी केले आहे.