अमळनेर : विक्की उत्तम जाधव
दिनांक २८ जानेवारी २०२३ शोभा इंडस्ट्रीचे गुणवतेवर आधारित नीलगंगा ब्रांडेड पीव्हीसी पाईप्स व एचडीपीई पाईप्स (MJP) मान्यताप्राप्त निर्मितीचे कार्य कृषी व तत्सम क्षेत्रात सुजलाम सुफलाम जलयुक्त शिवार करणेस दिशा दर्शक व समाजोपयोगी असल्याचे गौरवोद्गार डॉ.अनिल देशमुख जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा जळगाव यांनी ग्राहक पंचायत प्रतिनिधी समवेत अमळनेर एम आय डी सी अमळनेर येथे मे.शोभा इंडस्ट्रीज इंडस्ट्रीच्या पाईप्स मॅन्युफॅक्चरिंग विभागाला दिलेल्या भेटी दरम्यान झालेल्या कार्यक्रम मनोगतात व्यक्त केले. याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायती तर्फे प्रकाशित “ग्राहक भैरव “या स्मरणिकेचे वितरण एमआयडीसीचे चेअरमन श्री जगदीश भाई चौधरी व यशस्वी उद्योजिका सौ स्मिता चंद्रात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शेतकरी ग्राहक व ग्राहक संरक्षण कायदा या पुस्तिकेचे सुद्धा वाटप करण्यात आले.
या नंतर सर्व मान्यवरांनी शोभा इंडस्ट्रीज पाइप्स निर्मितीचे कार्य, थ्री लेयर पाइप , पी वी सी पाइप , एच डी पी इ पाइप निर्मिती ,कच्चा माल पुरवठा ,क्वालिटी कंट्रोल तपासणी , गुणवत्ता व वितरण व्यवस्था व पाइप कॉईल निर्मिती माहिती श्री प्रवर्तक जितेंद्र चंद्रात्रे यांचे कडून महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख व प्रमुख पाहुणे म्हणून एमआयडीसी चेअरमन श्री जगदीश भाई चौधरी खास उपस्थित होते. प्रास्ताविक ॲड.भारती अग्रवाल तालुकाध्यक्ष यांनी तर सूत्रसंचालन तालुका पालक मकसुद बोहरी यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष सौ.ताईसाहेब स्मिता चंद्रात्रे यांनी केले. याप्रसंगी बँकिंग व सायबर जिल्हाप्रमुख श्री विजय शुक्ल, सौ पद्मजा पाटील व प्रगतीशील शेतकरी श्री ज्ञानेश्वर विठ्ठल पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती पी.आर.ओ जयंतीलाल वानखेडे कळवितात.