मुंबई : वृत्तसंस्था
पत्राचाळ प्रकरणामध्ये ऑर्थर रोडमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आणखी भर पडताना दिसत आहे. ईडीने मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. ईडीच्या दोन टीमकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. या कारवाईबद्दल गुप्तता बाळगण्यात आली आहे.
पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर ईडीने मुंबईतील दोन ठिकाणी हे सर्च ऑपरेशन केले होते. यामध्ये काही महत्वाची कागदपत्रेही ईडीच्या हाती लागलेली होती. त्यानंतर आज पुन्हा ईडीकडून छापेमारी सुरु झाली आहे. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर ईडीने राऊत यांची कोठडी मागितली नाही. त्यानंतर राऊतांना 22 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आज ईडीने मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी ईडीने छापे मारले आहे.कोण कोणत्या ठिकाणी छापे मारण्यात आले आहे, याबद्दल गुप्तता बाळगण्यात आली आहे. मात्र, पत्राचाळ प्रकरणामध्येच ही कारवाई सुरू आहे. एकूण 2 टीमकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. या कारवाईबद्दल कमालीची गुप्तता बाळगण्यात आलेली आहे.
गोरेगाव पत्राचाळीतील जमिन घोटाळा प्रकरण आणखी किती जणांसाठी डोकेदुखी ठरणार हे आता काळच ठरवणार आहे. संजय राऊताांची चौकशी सुरु असतानाच दुसरीकडे मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी ईडीने छापेमारीला सुरवात केली आहे. ईडीचे लोकेशन समजू शकले नसले तरी राऊतांनंतर आता कारवाई कुणावर होणार हे पहावे लागणार आहे. मध्यंतरी याप्ररकरणी काही नगरसेवकांची देखील नावे समोर आली होती. त्यानुसार ही छापेमारी सुरु झाली का हे पहावे लागणार आहे. मुंबईतील काही ठिकाणी हे सर्च ऑपरेशन सुरु आहे. ईडीचे अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झाले आहेत.