जळगाव मिरर | २७ ऑक्टोबर २०२३
भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना तालुक्यातील कुसुंबा बसस्थानकासमोर घडली. या अपघातात दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे वास्तव्यास असलेला सागर मनोहर जगताप (वय-२५) हा तरूण मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता त्याचा मित्र मनोज पाटील यांच्या सोबत दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीई ७८५९ ) ने कसुंबा बसस्थानक येथून जात असतांना मागून भारधाव वेगाने येणारी कार क्रमांक (एमएच १२ व्ही १४४६ ) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील सागर जगताप आणि मनोज पाटील हे दोघे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सागर जगताप यांनी दिलेल्या फियादीवरून बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गफुर तडवी करीत आहे.