जळगाव मिरर | ४ डिसेंबर २०२३
दिवाळी संपली असून आता डिसेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. तर लग्नसराईच्या हंगामाला देखील सुरुवात झाली असून या काळात महिलांचे आकर्षण हे धातूंच्या वस्तूंवर अधिक असते. महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर घसरले होते. परंतु, लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दागिन्यांना विशेष मागणी असते.
सणासुदीच्या काळात सोन्याच्या भावात चढ-उतार पाहायला मिळाली. दिवाळीच्या काळात सोन्याचे दर नरमले होते. लग्नसराईत सोन्या-चांदीच्या भावाला मागणी असल्यामुळे दोन्ही धातूंमध्ये तेजी सत्र सुरु आहे.या वर्षी सोन्याने विक्रमी दराकडे तीन ते चार वेळी आगेकूच केली होती. मागच्या सहा महिन्यात सोन्याच्या दरात पतझड पाहायला मिळाली. जागतिक स्तरावरही सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे आज सोन्याच्या भावाने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. आज सोन्याच्या भावात ४४० रुपयांनी वाढ झाली.
गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,९०० रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६४,३५० रुपये मोजावे लागतील. तसेच चांदीच्या किमतीही स्थिर आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी ८०,५०० रुपये मोजावे लागतील.
1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती?
मुंबई -६४,२०० रुपये
पुणे – ६४,२०० रुपये
नागपूर – ६४,२०० रुपये
नाशिक – ६४,२३० रुपये
ठाणे – ६४,२०० रुपये
अमरावती – ६४,२०० रुपये