जळगाव मिरर । २९ जानेवारी २०२३ ।
अ.भा.हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभ २५ जानेवारी पासून गोद्री येथे सुरु झालेला आहे. बंजारा समाजाचा गौरवशाली इतिहास आणि संस्कृती आहे. हा समाज आदी काळापासून सनातन धर्म असलेला आहे. भोळ्या भाबड्या समाजाचा फायदा विघातक शक्ती घेत असून समाजात धर्मांतरण (ख्रिस्तीकरण) सुरु आहे. एक हिंदू धर्मांतरित झाला तर हिंदू समाजातून एक जण कमी होतो आणि देश विरोधी एक वाढतो असे स्वामी विवेकानंद म्हणाले होते. धर्मांतरण रोखण्यासाठी, आपल्या संस्कृती, परंपरा आणि आपला इतिहास समाजबांधवांना माहिती व्हावी यासाठी हा कुंभ असल्याचा सूर या कुंभाला उपस्थित असणाऱ्या संत , महात्मा यांनी व्यक्त केला.
बंजारा समाजाच्या ११,५०० तांड्यापैकी ३००० तांड्यावर इसाईकरण झाले आहे. ही समस्या गंभीर होऊ नये यासाठी अनेक संतांनी एकत्र येऊन गावोगावी जाऊन तांड्यांना भेटी देऊन बैठक घेतल्या आहेत. या कुंभाचे नियोजन ४ महिन्यापूर्वी झाले आहे. विविध समाजाचे विविध राज्यातील संत या कुंभात सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, पंजाब, हरियाणा, छातीसगड व यु.एस.ए. येथून भाविक या कुंभात सहभागी झाले आहेत.
धर्मावर आघात म्हणजे राष्ट्रावर आघात असतो. देशात ७ कोटी ख्रिश्चन आहेत. यात आपल्यातीलच काही लोक ख्रिस्ती झाले आहेत. जेथे जेथे ख्रिस्तीकरण वाढले तेथे वेगळे राज्य, वेगळा देश अशी मागणी झाली आहे. धर्मांतरण ही राष्ट्रविघातक शक्ती आहे. हे षड्यंत्र निकामी करण्यासाठी हा कुंभ आहे.
धर्मसभेत दोन प्रस्ताव पारित
या कुंभात धर्मसभेत बंजारा समजाहितासाठी व रक्षणासाठी दोन प्रस्ताव पारित करण्यात आले. यात पूज्य बालाजी, जगदंबा माता, भगवान श्री कृष्ण यांची मंदिरे प्रत्येक तांड्यात राहतील. प्रत्येक परिवार सकाळ – संध्याकाळ मंदिरात आरतीला जाईल व आपल्या परंपरांचे रक्षण करेल. घरा घरात महापुरुष संत सेवालाल, पूज्य रामराव बापू , पूज्य गुरुनानकदेवजी साहेब यांचे फोटो ठेवतील. पूज्य सेवालाल नित्यपाठ करतील. गोरमाटी भाषेचे संरक्षण व संवर्धन करतील. हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तर दुसर्या प्रस्तावामध्ये स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षात ख्रिस्ती लोकसंख्या १० पट वाढली आहे. त्यास धर्मांतरण हेच कारण आहे. बंजारा समाज प्राचीन काळापासून सनातन, हिंदू समाज रक्षक आहे. ख्रिश्चनांच्या द्रुष्ट चक्राचा हा समाज शिकार होत आहे.
५ राज्यातील ११ हजार तांड्यापैकी ३५०० तांड्यामध्ये चर्च दिसत आहेत. कर्नाटक आणि मध्यप्रदेश सरकारद्वारे धर्मांतर विरोधी कायदा लागू कारण्यात आले आहे. असे कायदे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यात त्वरित लागू करावेत. आदी विषय या प्रस्तावात आहे. सदर प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. काही लोक गोर बंजारा हे हिंदू नसून त्यांचा स्वतंत्र गोर धर्म आहे असे सांगून समाजात अपप्रचार करत आहेत. पण गोर बंजारा हे सनातनी आहेत. काही जण समाजाची दिशाभूल करत आहेत. हिंदू समाजात विविध जाती आहेत आणि त्यांच्या विविध प्रथा, परंपरा आहे. याचा अर्थ त्यांचा सर्वांचा वेगळा धर्म आहे असे नसून विविधतेत एकता असणारा सनातन हिंदू धर्म आहे. विविध राज्यात जे लोक भ्रमित होऊन धर्मांतरित झाले अशा सर्व बांधवांची घर वापसी होणार आहे. घर वापसी करणाऱ्या बांधवांचे सनातन हिंदू धर्मात स्वागत आहे . धर्मांतरण रोखण्यासाठी जेजे शक्य आहे तेते सर्व प्रयत्न केले जातील व धर्मांतराचे षढयंत्र निकामी करण्यासाठी व्यापक प्रयत्न केले जातील.