जळगाव मिरर | १७ डिसेंबर २०२३
जगभरातील घटना नेहमीच सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात पण सध्या राज्यातील एक घटना मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खोपोली नगर परिषदेच्या बसमध्ये महिला वाहक आणि एका महिला प्रवाशाची फ्री स्टाईल हाणामारी झाल्याने ही घटना चर्चेचा विषय बनली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खोपोली नगर परिषदेच्या बसमध्ये सुट्या पैशांच्या वादातून प्रवासी महिला आणि महिला वाहक यांच्यामध्ये तुफान राडा झाला. या महिलेनं तिकीट काढलं, मात्र वाहक महिलेकडे तिकीटाचे उर्वरित पैसे देण्यासाठी सुटे नव्हते, यावरून सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर भांडण सुरू झालं. या दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली, शेवटी प्रवाशांनी मध्यस्थी करत हा राडा सोडवला. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. बसमध्ये प्रवासी महिला आणि महिला वाहक यांच्यामध्ये जोरदार राडा सुरू असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. शेवटी प्रवाशांच्या मध्यस्थिनं हा वाद सोडवण्यात आला. या व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.