आजचे राशिभविष्य दि २८ डिसेंबर २०२३
मेष : गुंतवणूक करणे टाळा. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण उत्फूल्ल होईल. चुकीचा निरोप गेल्यामुळे किंवा चुकीच्या संवाद साधण्यामुळे तुमचा दिवस खराब जाऊ शकतो. प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. जोडीदाराच्या वागण्याचा कदाचित गैरसमज करून घ्याल.
वृषभ : खर्च भागतील. दीर्घकालीन फायदा देणाऱ्या प्रकल्पांवर काम करा. प्रवास-करमणूक आणि लोकांमध्ये मिसळणे हाच तुमच्या आजच्या दिवसाचा विषय आहे. आयुष्यातील अनेक चढ-उतारांनंतर आज अखेर तुमच्यासाठी सुवर्णदिन असणार आहे.
मिथुन : आर्थिक लाभ होईल. राहते घर बदलणे अत्यंत शुभदायी ठरेल. कामात तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. वेळच्या वेळी आणि चपळाईने कृती केली तर इतरांच्या थोडे वर राहू शकाल. हाताखालच्या सहकाऱ्यांच्या उपयुक्त सूचना लक्षपूर्वक ऐकून घ्या. जोडीदाराने दिलेल्या मनस्तापाचा तुमच्या प्रकृतीवर परिणाम होईल.
कर्क : धन लाभ होईल. घरातील प्रलंबित कामं आज तुमचा बराच वेळ खातील. ऑफिसमध्ये लवकर सुट्टी होऊ शकते याचा तुम्ही फायदा घ्याल आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत कुठे फिरायला जाऊ शकतात. अनपेक्षित पाहुण्यामुळे तुमचे प्लॅन कदाचित बारगळतील. पण, तुमचा दिवस निश्चितच चांगला जाईल.
सिंह : आर्थिक पक्ष आज मजबूत राहील. नवा लूक, नवा पेहराव आणि नवे मैत्र लाभेल. दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकतात. मानसिक शांततेचा अनुभव होईल. जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल.
कन्या : दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रीणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. एकमेकांचा दृष्टिकोन समजावून घेऊन वैयक्तिक प्रश्न सोडवा. तुमची समस्या चव्हाट्यावर आणू नका अन्यथा तुमची बदनामी होण्याची शक्यता अधिक आहे.
तूळ : आर्थिक बचत करा. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. वरिष्ठ सहकाऱ्यांना आणि बॉसला आपल्या घरी बोलाविण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. तुमचे चुंबकीयसदृश आत्मविश्वासी आनंदी व्यक्तिमत्व तुम्हाला प्रकाशझोतात आणेल.
वृश्चिक : आर्थिक दिवस सामान्य. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता. बऱ्याच कामांना सोडून तुम्ही आज आपल्या आवडीच्या कामांना करण्याचे मन बनवाल. विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण तुम्ही आज अनुभवू शकाल.
धनु : जमीन, स्थावर जंगम मालमत्ता, किंवा सांस्कृतिक प्रकल्प यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रीत करा. आपल्या जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी करावी लागेल आणि वैद्याकीय मदतीची गरज भासेल. कामात सहकारी, सहयोगी तुमच्या मदतीस येतील, पण फार काही मदत देऊ शकतील असे दिसत नाही.
मकर : पैसा कमावण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. कामाच्या ठिकाणी तुमचा दृष्टीकोन आणि कामाचा दर्जा यात सुधारणा होईल. कार्य क्षेत्रात कुठल्या कामात खराबी असण्यामुळे तुम्ही आज चिंतीत राहू शकतात. वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहेत, असे वाटते.
कुंभ : आर्थिक लाभ होतील. आपल्या कामाबद्दल आणि आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन स्पष्ट आणि चोख असू द्या. मार्गदर्शन करण्याच्या सहज भावनेतून सर्वांना मदत करा. कौटुंबिक आयुष्यात आपोआप मधुर संबंध प्रस्थापित होतील. करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी व्यावसायिक ताकद वापरा.
मीन : खर्च वाढतील. कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रीत करणे प्राथमिकता असेल. नवी भागीदारी आशाजनक असेल. तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल, तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल.