जळगाव मिरर | १३ जुलै २०२३
राज्यातील सत्तेत येवून अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन जवळपास १० दिवसांचा संपले असतांना अद्यापही नवीन सरकारच्या खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. मंत्रीपदावरून तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून रस्सीखेच सुरू आहे. अशातच खातेवाटप आणि राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता मावळली आहे. सगळ्यात पक्षातील नेते विस्ताराकडे लक्ष लावून बसले आहेत यावेळी पण आमदार पदरी नाराजा येण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे रखडलेले खाते वाटप अधिवेशनाआधी मार्गी लागण्याची शक्यता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी काल बुधवारी (12 जुलै) रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केल्याची माहीती आहे.