जळगाव मिरर । २७ जानेवारी २०२३ ।
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त रामराज्य ग्रुप दादावाडी तर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच माजी सैनिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला शेखर बोरसे सर, निलेश बोरसे सर, एकनाथ माळी सर, राजेंद्र भामरे सर, नगरसेवक चंद्रशेखर पाटील, संतोष पाटील, प्रवीण अकॅडमीचे संस्थापक. कैलास पाटील सर, शक्ती महाजन, दत्तात्रय कापुरे व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात कोरोना कालावधीत ज्यांनी लोकांची सेवा उस्फुर्तपणे केली आणि भारताच्या सीमेवर असलेल्या सैनिकांनी आपल्या केलेल्या कर्तव्यदक्ष कामगिरीची दखल घेत रामराज्य ग्रुपतर्फे या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच कमी वयात रोहिणी सोनवणे हिने पाहिल्याच प्रयत्नात MPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवत जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता पदावर झेप घेतल्यामुळे त्यांचा रामराज्य ग्रुपतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमात सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ट्रॉफ्या देण्यात आल्या. रामराज्य ग्रुपतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
या प्रसंगी रामराज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नितीन जाधव, प्रशांत अहिरे सर, प्रवीण पाटील, निलेश पाटील हितेश बागुल, प्रशुम भोळे, देवेश बिरपण, प्रशांत तळले, धिरज पाटील आणि दुर्गेश पाटील सर्व मित्रपरिवार यांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आणि सूत्रसंचालन प्रशांत अहिरे सर यांनी केले