• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 22, 2026
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य
0
बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ जून २०२६ 

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर घडला असून महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. भाजपमधून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी कायम ठेवणारे गोकुळ गिते यांनी पहिल्याच फेरीत विजयाचा कोटा पार करत दणदणीत विजय मिळवला. या निकालामुळे महायुतीत खळबळ उडाली असून क्रॉस व्होटिंग, अंतर्गत नाराजी आणि विश्वासघाताच्या चर्चांना मोठे उधाण आले आहे.

या निवडणुकीत एकूण ६१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी १३ मते अवैध ठरल्याने ६०५ मते वैध मानण्यात आली. विजयासाठी ३०३ मतांचा कोटा आवश्यक होता. मतमोजणीदरम्यान गोकुळ गिते यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आणि तब्बल ३५७ मते मिळवत विजयाचा टप्पा सहज पार केला. दुसरीकडे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना केवळ २४८ मतांवर समाधान मानावे लागले. आणखी एक उमेदवार प्रसाद हिरे यांना एकही मत मिळाले नाही.

गोकुळ गिते हे सुरुवातीपासूनच या निवडणुकीतील चर्चेचे केंद्र होते. मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे गिते यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. गिरीश महाजन, उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी सक्रिय प्रचार करणार नसल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांच्या समर्थकांकडून पडद्यामागे प्रचार सुरू असल्याच्या चर्चा निवडणुकीपूर्वीपासूनच रंगल्या होत्या. निकालानंतर त्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.

मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच गोकुळ गिते यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. “मी स्वतः प्रचार केला नसला तरी माझ्या कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम केले आहे. विजय माझाच होईल,” असा दावा त्यांनी केला होता. प्रत्यक्ष निकालात तो दावा खरा ठरला.

दरम्यान, मतमोजणी केंद्रातही मोठा गोंधळ निर्माण झाला होता. नरेंद्र दराडे यांचे बंधू आणि विद्यमान आमदार किशोर दराडे हे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असल्याबाबत गोकुळ गिते यांनी हरकत घेतली. निवडणूक नियमांनुसार विद्यमान लोकप्रतिनिधींना प्रतिनिधी म्हणून बसण्याची परवानगी नसल्याचा दावा करत त्यांनी आक्षेप नोंदवला. यानंतर दोन्ही गटांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक वाद रंगला आणि काही काळ मतमोजणी प्रक्रिया ठप्प झाली. निवडणूक अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत पोलिस बंदोबस्तात परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर मतमोजणी पुन्हा सुरू करण्यात आली.

पराभवानंतर नरेंद्र दराडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महायुतीतील काही नेत्यांनीच आपला घात केल्याचा आरोप करत त्यांनी, “एकनाथ शिंदे यांना सोडले तर महायुतीतील इतर अनेकांनी माझा विश्वासघात केला,” अशी खंत व्यक्त केली. दुसरीकडे, खासदार संजय राऊत यांनी ठाकरे गटाच्या मतदारांनी शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात मतदान केल्याचा दावा केला. तर मंत्री गिरीश महाजन यांनी हा निकाल धक्कादायक असल्याचे मान्य करत पराभवाची कारणमीमांसा केली जाईल, असे स्पष्ट केले.

नाशिकमधील हा निकाल केवळ एका मतदारसंघापुरता मर्यादित नसून महायुतीतील अंतर्गत मतभेद, स्थानिक पातळीवरील नाराजी आणि संघटनात्मक आव्हाने अधोरेखित करणारा मानला जात आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निकालाकडे राज्यभरातील राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

Related Posts

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
ब्रेकिंग

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !

तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !

July 10, 2026
शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !

शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !

July 10, 2026
अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !

अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !

July 10, 2026
चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group