जळगाव मिरर | २७ ऑक्टोबर २०२३
जगभरातील अनेक देशात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे अनेक देशाने ‘हम दो हमारे दो’ चा निर्णय घेतला आहे. आई होणे हा प्रत्येक स्त्रीसाठी खूप खास अनुभव असला तरी सोपा नक्कीच नसतो. प्रसुती वेदना सहन करणे खूपच कठीण असते. गरोदरपणात महिलांना मानसिक आणि शारीरिक अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याच कारणामुळे आजकाल महिलांना एकापेक्षा जास्त मूल नको असते. पण एका रशियन महिला याला अपवाद ठरत आहे. तिने एक किंवा दोन नव्हे तर 22 मुलांना जन्म दिला. ही महिला केवळ 26 वर्षांची आहे.
26 वर्षीय रशियन महिला क्रिस्टीना ओझटर्क जॉर्जियामध्ये राहते. तिला 22 मुलं आहेत पण तिला हा आकडा 3 अंकांवर म्हणजेच 100 वर न्यायचा आहे. मुलांना जन्म देण्याच्या बाबतीत तिला शतक करायचं आहे. 26 वर्षीय महिलेला 22 मुलं कशी होऊ शकतात हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. पण तिला 100 मुलांना जन्म द्यायचाय हे ऐकून अनेकांना धक्काच बसतोय..
मोठी 8 वर्षांची मुलगी व्हिक्टोरियावेळी क्रिस्टीनाला नैसर्गिकरित्या गर्भधारणा झाली होती. मात्र त्यानंतरची सर्व 21 मुले सरोगसीद्वारे जन्माला आली. या 21 पैकी 20 मुलांचा जन्म 2020 मध्ये झाला होता. ती त्या सर्वांवर खूप प्रेम करते.