जळगाव मिरर | ८ मार्च २०२४
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी एलपीजी सिलिंडरची किंमत १०० रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले आपल्या स्त्रीशक्तीचा विशेष फायदा होईल.
स्वयंपाकाचा गॅस अधिक किफायतशीर बनवून, आम्ही कुटुंबांच्या कल्याणासाठी आणि निरोगी वातावरणाची खात्री करण्याचे देखील ध्येय ठेवतो. हे महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्यासाठी ‘जीवन सुलभता’ सुनिश्चित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे.
X वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट लिहिली आहे. त्यात म्हटले आहे की, “महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही गॅस सिलेंडरचे दर शंभर रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला शक्तीचे जीवन तर सुसह्य होईल. तसेच कोट्यवधी कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल. हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठी देखील उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य देखील सुधारेल.”