जळगाव मिरर | ४ जानेवारी २०२४
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका नियमित घडत असताना नुकतेच विदर्भांतून एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. या भीषण अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू तर मुलगी गंभीर जखमी असल्याचे समजते. हा अपघात वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आठवा मैल चौकात झाला आहे.
मिळालेल्या महाहतीनुसार, नागपूरवरून अमरावतीकडे कारचा वेग प्रचंड असल्यामुळे वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आठवा मैल चौकात कार पलटी झाली आणि दुभाजकाला धडकली. या भीषण अपघातात रजनी गिरणाळे आणि त्यांचा मुलगा अक्षय गिरणाळे यांचा अपघातात मृत्यू झाला असून श्रद्धा गीरणाळे गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात इतका भीषण होता कि कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतांना कारमधून बाहेर काढले. जखमी मुलीला तात्काळ रुग्णालयात हलवले आहे. दरम्यान अपघात झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.