जळगाव मिरर | १५ सप्टेंबर २०२३
राज्यातील नाशिक शहर अनेक दिवसापासून गुन्हेगारीच्या घटनेने मोठे चर्चेत येत असतांना पुन्हा एकदा धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे. पत्नी माहेरी निघून गेल्याने संतप्त पतीने स्व:ताच्या अंगावर पेट्रोल टाकून घेत पेटवून घेतले. जखमी पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हि घटना क्रांतीनगर भागात घडली असून याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदूरनाका साई लॉन्स परिसरातील विनोद राजाराम चव्हाण (वय ३०) हे दांम्पत्याचा कौटुंबिक वाद झाला होता. त्यामुळे पत्नी मनिषा चव्हाण क्रांतीनगर भागातील उबाळे चाळीत राहणा-या आपल्या आईच्या घरी निघून गेली होती. पत्नीस विनवण्या करूनही ती माघारी येत नसल्याने सोमवारी दि.११ दुपारच्या सुमारास चव्हाण याने आपली सासूरवाडी गाठून स्व:ताच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले होते. या घटनेत तो गंभीर भाजल्याने मेव्हणा ऋषीकेश पवार यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना गुरूवारी वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. याबाबत पोलिस नाईक गायकवाड यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.