जळगाव मिरर | ८ ऑगस्ट २०२३
देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पार्टीचे नेते राहुल गांधी यांना खासदारकी बहाल झाली आहे. त्यानंतर आज संसदेत आज विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला असून पंतप्रधान मोदी यांना विरोधकांनी तीन प्रश्न विचारले आहे. गेल्या तीन ते चार महिन्यापासून देशातील मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा मुद्दा संसदेत तापला असून याबाबत पंतप्रधान मोदींनी तब्बल 80 दिवसांनी माध्यमांसमोर येत केवळ 30 सेकंदाची भूमिका मांडल्याने या मुद्द्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे. यावेळी विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीकडून थेट पंतप्रधान मोदींना तीन प्रश्न देखील विचारण्यात आले. यावेळी विरोधकांनी मोदींनी मणिपूरच्या मुद्द्यावर तीन प्रश्न विचारले.
१. पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला का गेले नाही, या ठिकाणी देशातील प्रत्येक विरोधी पक्ष नेते व पदाधिकारी यासह गृहमंत्री गेले गृहराज्यमंत्री गेले पण देशाचे प्रमुख पद असलेले पंतप्रधान मोदी का गेले नाही?
२. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरचा मुख्यमंत्र्यांना आजपर्यंत त्या पदावरून का काढलं नाही तुम्हाला गुजरातमध्ये राजकारण करायचं होतं तेव्हा तिथे एकदा नाही दोनदा तुम्ही मुख्यमंत्री बदलले उत्तराखंडमध्ये निवडणुका आल्या तेव्हा एकदा नवे चार वेळा मुख्यमंत्री बदलले त्रिपुरातही निवडणुका आधी तुम्ही मुख्यमंत्री बदलले मग मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही काय एवढा आशीर्वाद देत आहात त्यावेळी स्वतः हे मान्य केलं आहे की त्यांच्यामुळे इंटेलिजन्स फेल्युअर झाल.
३. मणिपूर येथे झालेल्या हिंसाचारावर पंतप्रधान मोदींना यावर बोलण्यासाठी तब्बल 80 दिवस का लागले व जेव्हा बोलले तेव्हाही 30 सेकंद बोलले. या मुद्द्याहून सभागृहात विरोधकांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर प्रश्न विचारले आहे.