जळगाव मिरर | ६ ऑक्टोबर २०२४
राज्यातील महायुती सरकारने गेल्या दोन महिन्यापासून अनेक नवीन योजनेच्या मोठ्या घोषणा केल्या होत्या त्या योजनेचा अनेकांनी लाभ देखील घेतला असून आता गॅस जोडणी नावावर असलेल्या महिलांनाच अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अन्नपूर्णा या तीन मोफत गॅस सिलिंडर योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. बहुतांश गॅस जोडण्या घरातील पुरुषांच्या नावावर आहेत. त्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत आहे.
आता सरकारने आदेशामध्ये सुधारणा केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र ठरविलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्याच्या नावे असलेली गॅस जोडणी स्वतःच्या नावे हस्तांतर केल्यावर त्या महिलेला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत म्हणजे तीन गॅस सिलिंडर मोफत योजनेचा लाभ मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.