आजचे राशिभविष्य दि ८ मार्च २०२४
मेष
व्यवसायानिमित्ताने जवळचा प्रवास घडेल. तुमच्या क्षेत्रातील कामगिरीबद्दल तुम्हाला पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल. तुमच्या भावंडांकडून तुम्हाला एखादी गोड बातमी कळेल. मोठ्या पोस्टची नोकरी शोधणाऱ्यांना आज यश मिळेल. आज भाग्य तुम्हाला साथ देईल. अविवाहितांचा साखरपुडा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत चांगला जाणार आहे.
वृषभ
आज तुम्हाला थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभतील. उत्पन्नाच्या नव्या स्त्रोतामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होईल. एका मोठ्या ऑर्डरमुळे तुमच्या व्यवसायाला नवीन उंची मिळून जाईल. पण कोणत्याही करारावर सही करताना सावध राहा. संपूर्ण खातरजमा केल्यानंतरच पुढचं पाऊल टाका. अति विश्वास अडचणीचा ठरू शकतो. आज रेंगाळलेल्या योजनाही मार्गी लागतील. घराची दुरुस्ती करण्याचा विचार कराल.
मिथुन
आजचा दिवस तुमच्यासाठी आशादायी आहे. आज तुम्ही बौद्धिक पातळीवरील सर्व कामे चुटकीसरशी मार्गी लावाल. आज तुम्ही गरजवंतांना मदत कराल. तुमच्या प्रियव्यक्तींना अधिक सहकार्य कराल. त्यामुळे तुमचा मान वाढेल. हातातील कामे मार्गी लागतील, आईवडिलांचे आशीर्वाद कामी येतील. प्रवासाचा योग आहे. पण वाहने जपून चालवा. खरेदी विक्रीचे व्यवहार होतील. पण हे व्यवहार करताना जपून करा. आज आरोग्याच्या कुरबुरी जाणवतील. त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या.
कर्क
आज तुमचा मूड खराब असेल. आळसावलेपणा येईल. तुमची तब्येत बिघडू शकते. त्यामुळे तुमच्या दैनंदिन कामावर त्याचा परिणाम होईल. पर्यटनाला जाण्याचा योग आहे, पण पर्यटनाला गेल्यावर अति साहसीपणा करू नका. अविश्वासू स्त्रोतांवर विश्वास ठेवू नका. धंद्यात खोट येऊ शकते. स्वत: खात्री करूनच निर्णय घ्या. महिलांसाठी आजचा दिवस अत्यंत चांगला जाईल. महिलांना नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे.
सिंह
अनेक दिवसांपासून सुरू असलेले प्रयत्न आज मार्गी लागतील. आज तुम्हाला एक महत्त्वाची ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या व्यवसायाचा वेगाने विस्तार होऊ शकतो. तुमची इच्छाशक्ती अत्यंत पॉवर फुल आहे. जेव्हा तुमची इच्छाशक्ती वाढते तेव्हा तुम्ही कठिण प्रसंगातही उत्तम निर्णय घेता, आजही तुमच्याबाबतीत हाच प्रकार घडणार आहे. तुमच्या व्यावसायिक निर्णयात तुम्हाला तुमच्या कर्मचाऱ्यांची खंबीर साथ मिळेल.
कन्या
आज एखाद्या प्रभावी व्यक्तीशी भेट होईल. त्यामुळे तुमचा आजचा दिवस अत्यंत चांगला जाईल. आज तुमच्या मागची साडेसाती जाईल. तुमचं नशीब बदलू शकतं. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही नुकसानीत आहात, आता तुम्हाला फायदा मिळण्यास सुरुवात होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. अविवाहितांचं घोडं एकदाचं गंगेत न्हाणार आहे. विवाह योग जुळून येतील. अचानक जुन्या मित्राची भेट होईल. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.
तुळ
परदेशी जाण्याचा योग जुळून येऊ शकतो. विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करावं. कलाकारांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कलाकृती किंवा कलात्मक गोष्टींची खरेदी कराल. एखादा नवीन व्यवसाय सुरू कराल किंवा नवीन वाहन खरेदीचा योग आहे. जमिनीचे व्यवहार पूर्ण होतील. कोर्ट कचेरीची प्रकरणे मार्गी लागण्याची शक्यता आहे. आईवडिलांचे आशीर्वाद नेहमीच बळ देत राहतील.
वृश्चिक
आज तुम्हाला सुस्ती जाणवेल. आरोग्याच्या तक्रारी पुन्हा सुरू होतील. गेल्या अनेक वर्षापासूनच्या कर्जाची चिंता सतावू लागेल. छोट्या छोट्या चुकांमुळे अपराधीपणाची भावना मनात निर्माण होईल. साहसी खेळात भाग घेताना किंवा ड्रायव्हिंग करताना काळजी घ्या. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. नोकरदारांसाठीही आजचा दिवस जेमतेम असाच राहील. प्रेमीयुगलांना आजच्या दिवशी आनंदाची बातमी मिळेल. बेरोजगारांनी प्रयत्न केल्यास हाताला काम मिळण्याची शक्यता आहे.
धनु
आजचा चंद्र प्रभाव तुमच्यातील अंतरीक शक्ती वाढवू शकतो. नव्या व्यवसायाची संधी आहे. दाम्पत्यांना संतानप्राप्तीबाबतची सकारात्मक बातमी ऐकायला मिळेल. प्रेमी युगल जीवनसाथीशी संवाद साधून महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. नोकरदारांना चांगल्या संधी मिळू शकतात. परंतु तुमच्या कौटुंबिक खर्चात मोठी वाढ होऊ शकते, ज्यामुळे तुमचे मन अस्वस्थ होऊन तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
मकर
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे, कारण बऱ्याचश्या गोष्टी योग्य दिशेने जात आहेत. तुमच्या कठोर मेहनतीचं फळ मिळण्याचा हा काळ आहे. तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला शाबासकी मिळेल. नोकरदारांना ऑफिसमध्ये पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाऊ शकतं. व्यावसायिकांचा अडकलेला पैसा परत मिळेल. त्यामुळे कंपनी वेगाने धावेल. कायदेशीर प्रकरणात यश येण्याची शक्यता आहे. व्यवहार करताना काळजी घ्या.
कुंभ
रोजगाराशी संबंधित आशादायी बातमी मिळेल. नोकरीचा शोध घेणाऱ्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. नोकरभरती प्रक्रियेत नशीब अजमावणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. अविवाहितांना जीवनसाथी मिळेल. तर विवाहितांच्या घरात कुरबुरी सुरू होतील. मुलाच्या जन्माशी संबंधित गुड न्यूज मिळेल. तीर्थयात्रेला जाण्याचा योग आहे. अपेक्षेपेक्षा अधिक खरेदी कराल. महिलांसाठी आजचा दिवस सकारात्मक जाईल. महिलांना नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.
मीन
नव्या घरात राहण्याला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचा दिवस अत्यंत चांगला जाईल. प्रवासाचाही योग आहे. मात्र, प्रवासाला जाण्याबाबतचा निर्णय योग्यवेळी घेतल्यास फायदा होईल. गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. मार्केट आणि खर्चाचा अंदाज घेऊनच गुंतवणूक करा. संध्याकाळी तब्येतीची कुरबुर जाणवेल. कठिण प्रसंगात वरिष्ठांचा सल्ला घ्या. कौटुंबिक खर्चात मोठी वाढ होऊ शकते, अनावश्यक खर्च टाळा.