जळगाव मिरर | २ डिसेंबर २०२३
राज्यातील अनेक तरुणांनी शिक्षण घेतलेले असून देखील तरुणांना राज्यात नोकरी मिळत नसल्याची ओरड होत असतांना आता नोकरीची एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. राज्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, औरंगाबाद अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 150 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 06 डिसेंबर 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.
संस्था – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, औरंगाबाद
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार
पद संख्या – 150 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 06 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – औरंगाबाद
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10वी/ITI पास असणे आवश्यक आहे.
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. ऑनलाईन अर्ज सादर करताना आवश्यक असलेल्या गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे.
5. शैक्षणिक व इतर कागदपत्रांची साक्षांकीत छायांकित प्रत सादर न करणा-या उमेदवाराच्या ऑनलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही.
6. अर्ज प्रक्रिया 06 डिसेंबर 2023 पासून सुरु होईल.