जळगाव मिरर | १९ डिसेंबर २०२३
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील काकनबर्डी परिसरात यात्रा सुरु आहे. या यात्रेतुन एका १९ वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील गिरड रोडवरील काकनबर्डी येथे चंपाषष्ठी निमित्त खंडेरायाचा यात्रोत्सवातुन दि.१८ डिसेंबर रोजी पाचोरा शहरातील एका भागातील १९ वर्षीय तरुणी ही अचानक बेपत्ता झाली आहे. तरुणीचा सर्वत्र शोध घेतला असता, तरुणी मिळुन न आल्याने १९ डिसेंबर रोजी तरुणीच्या वडिलांच्या सांगण्यावरून हरविल्याची नोंद करण्यात आली. तरुणीचा शोध पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुर्यकांत नाईक हे घेत आहेत.