जळगाव मिरर / १९ डिसेंबर २०२२
राज्यातील तरुणाचे नेहमीचे स्वप्न असते ते म्हणजे पोलीस होणे. याच पोलीस भरतीसाठी गेल्या तीन वर्षांपासून तरुण नियमित सराव करीत आहेत व राज्याने नुकतीच जाहीर केलेल्या भरतीत आपल्या भविष्य अजमावीत आहेत. राज्य सरकारने महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पोलीस दलात शिपाई आणि चालक पदांवर भरती करण्यात येत आहे. यंदाची पोलीस भरतीतील 18 हजार पदांसाठी 18 लाखांहून अधिक अर्ज दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी अर्ज दाखलक करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर होती. या तारखेपर्यंत 18 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पोलीस शिपाई पदासाठी 12 लाख 25 हजार 899 अर्ज आले आहेत. तर चालक पोलीस हवालदार 2 लाख 15 हजार 132 अर्ज आले आहेत.
पोलीस भरतीत आता तृतीयपंथीयांनाही संधी
मुंबई उच्च न्यायालयाचा तृतीयपंथीयांनाही पोलीस भरतीत संधी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे पोलीस भरतीत तृतीयपंथीयांसाठीही संधी मिळणार आहे. न्यायालयाने सरकारला तृतीयपंथीयांसाठी नियमावली सुधारत शारीरिक चाचणीशी संबंधित निकषांमध्ये सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत.फेब्रुवारी 2023 पर्यंत राज्य सरकार पोलीस भरतीत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र नियमावली बनवणार आहे.
18 हजार 331 पदांसाठी पोलीस भरती
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 मध्ये पोलीस शिपाई पदाच्या एकूण 17130 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक विभागातील पोलीस शिपाई पदाच्या 14956 आणि चालक पोलीस शिपाई पदाच्या 2174 जागा आहेत. एसआरपीएफ पोलीस शिपाई पदाच्या 1204 पदांवर भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले. पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर होती.
पोलीस भरतीसाठी 71 तृतीयपंथींचे अर्ज
महाराष्ट्र पोलीस विभागाकडे 18,331 रिक्त पदांसाठी 18 लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. हे अर्ज पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या पदासाठी आहेत. पोलीस भरती प्रकियेत तृतीयपंथीयांना अर्ज भरण्यासाठी परवानगी दिल्यानंतर तृतीयपंथीयांनीही उमेदवारी अर्ज दाख केले आहेत. पोलीस शिपाई पदासाठी 68 आणि पोलीस शिपाई चालक या पदासाठी पाच तृतीयपंथीचे अर्ज आले आहेत. भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर होती परंतु ऑनलाइन प्रक्रियेत काही गैरसोय झाल्यामुळे ही तारीख 15 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.
