जळगाव मिरर | १७ जानेवारी २०२४
सध्या राज्यात अनेक गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीने प्रेमास नकार दिल्यावर ३५ वर्षीय व्यक्तीने भररस्त्यात धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून सध्या तरुणीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी आरोपीरोद्धात गुन्हा दाखल केला आहे.हल्ला केल्यानंतर तो पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पूर्व येथे दि.१५ सोमवार रोजी ही धक्कादायक घटना गोरेगाव येथे राहणारा आरोपी संजय बयास याने त्याच्या परिसरात राहणाऱ्या तरुणीस तिच्यावर प्रेम असल्याचे सांगत होता. पंरतू पीडित तरुणीने(वय.१९)त्याच्या प्रेमाला नकार दिला होता. तरुणी बी.कॉम.च्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. तरुणीने बयासला नाही बोल्यानंतर तरुणीचे कुंटुब आणि बयास यांच्यामध्ये काही वाद झाले होते परंतू नंतर गोष्टी निवळल्या होत्या.
सगळ्या गोष्टी निवळल्या असलेल्या होत्या असे सगळ्यांना वाटत असल्यातरी बयासच्या मनाला तरुणीचा नकार पचवता आला नाही. सोमवारी दुपारी पीडित तरुणी घरी परतत असताना बयास पाठीमागून त्याने तिचे डोके धरले आणि ब्लेडच्या साहाय्याने तिचा गळा चिरला. सर्व घटना तरुणीच्या घराजवळच घडली. वार केल्यानंतर आरोपी घटना स्थळावरुन लगेचच फरार झाला आणि तरुणीला परिसरातील लोकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. सर्व घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
तरुणीला झालेली जखम खोल असून चार टाके पडले आहेत. मात्र सध्या तरुणीची प्रकृती स्थिक असून तिच्याकडून सर्व घटनेची माहिती घेतली असून बयास विरोध्दात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, तरुणीवर हल्ला केला तेव्हा बयास दारुच्या नशेत असल्याचा आम्हाला संशय आहे. त्याच्याविरोध्दात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या साक्षीदारांची सध्या ओळख पटवण्याचे काम चालू आहे.