जळगाव मिरर | ५ मार्च २०२४
देशातील अनेक राज्यात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना एक धक्कादायक घटना झारखंडच्या पलामू जिल्ह्यातून समोर आली आहे. एका ऑर्केस्ट्रा ग्रुपमधील २१ वर्षीय तरुणीवर ३ लोकांनी अत्याचार केल्याची घटना घडलीय. पलामू बिश्रामपूर पोलिसांत रविवारी दाखल केलेल्या एफआयआरनुसार गुन्हेगार हे पीडितेच्या ओळखीचे होते.
मिळालेल्या माहितीनुसार, यातील दोघांना अटक करण्यात आली असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अजय कुमार आणि दिवाना कुमार, अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. गोलू हा फरार आहे. तिघांवरही आयपीसीच्या कलम ३२८ (दुखापत करणे) आणि ३७६ (२) (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी कार्यक्रमासाठी ऑर्केस्ट्रा डान्सरला बोलवलं होतं. गोलू कुमार नावाच्या आरोपीने महिला डान्सरला कार्यक्रमासाठी आंमत्रित केलं होतं. परंतु कार्यक्रम रद्द केल्याने डान्सर कुमारच्या घरात बसून राहिली, होती अशी माहिती, बिश्रामपूरचे एसडीपीओ राकेश सिंह म्हणाले. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, २१ वर्षीय पीडितेने आरोप केला आहे की, तिला पेय दिले गेले. ते प्यायल्याने ती बेशुद्ध झाली, त्यानंतर तिघांनी तिच्यावर अत्याचार केला.