जळगाव मिरर | ३१ डिसेंबर २०२३
जगभरात नव्या वर्षाचे जंगी स्वागताची तयारी सुरु असतांना राज्यातील पोलिसांनी आता अनेक पार्ट्यावर करडी नजर राहणार आहे. घोडबंदर रोड परिसरात ठाणे पोलिसानी कारवाई करीत रेव्ह पार्टी उधळून लावली आहे. यात लाखो रुपयांचा अवैध सामान पोलिसांना जप्त केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेव्ह पार्टी सुरू असल्याच्या संशयावरून सदर कारवाई करण्यात आली आहे. या पार्टीसाठी आलेल्या तरुण अणि तरुणींना पोलिसानी ताब्यात घेतले आहे. 90 युवक आणि 5 महिला यांचा समावेश यामध्ये आहे. त्यांना तपासणीसाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. छाप्यात पोलिसांना चरस अणि गांजा तसेच एमडी ड्रग देखील सापडले आहे. ठाणे पोलिसांच्या युनिट 5 कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसाक, 31 डिसेंबर रोजी पहाटे 3 वाजता वडवली खाडीकिनारी ही रेव्ह पार्टी चालू होती. छाप्यादरम्यान या ठिकाणी जमलेले 90 पुरुष, 5 महिला दारू पिऊन मद्यधुंद अवस्थेत डीजेच्या तालावर नाचत होते. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून सदर कार्यक्रमाचे आयोजन तेजस अनिल कुबल, सुजल महादेव महाजन यांनी केले होते. याठिकाणी चरस (70 ग्रॅम), एलएसडी (0.41 ग्रॅम), एस्केटसी पिल्स (2.10 ग्रॅम), गांजा (200 ग्रॅम), बिअर/वाइन/व्हिस्की आणि मद्य विक्रीसाठी असल्याचे आढळून आले. तसेच घटनास्थळावरून गांजा ओढण्याचे साहित्य, डीजे मशीन, 29 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.